लॉकडाऊन वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

काय आहे परिस्थिती? देशात ओडिशा आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवण्यापूर्वीच राज्यात लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली होती. ओडिशाने पहिल्यांदा हा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाबने त्याची घोषणा केली होती. मुळात देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. देशात पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर देशात सगळीकडं जसजसे विदेशातून प्रवासी येतील, तसा सगळीकडचं आकडा वाढू लागला. भारतात सुरुवातीच्या टप्प्यात विदेशातून आलेल्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याचे दिसत होते. पण, गेल्या आठवड्यापासून भारतात सामूहिक संसर्गाच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या भारतात असेलल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 38 टक्के रुग्ण कोठेही विदेशात प्रवास केलेले नाहीत. त्यामुळं सध्या 15 राज्यांतील 36 जिल्ह्यांत आढळलेले रुग्ण कधीही परदेशी गेलेले नाहीत. त्यामुळं कोरोनाचं देशावरील संकट आणखीनच गडद झाले आहे. त्यामुळंच भारतात कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवण्याची गरज होती.